*अनेक गोष्टींवर आवळा सरबत गुणकारी*
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा सरबत घेतल्याने आपले आरोग्य चांगले राहते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. जाणून घेऊ त्याचे महत्व ''
*1.* आवळा सरबत घेतल्याने सतत तोंड येत असेल तर ही समस्या दूर होते. तसेच डोळ्यांची शक्ती वाढण्यास मदत होते.
*2.* आवळा सरबत प्यायल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते.
*3.* आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्यास मदत होते.
*4.* आवळा खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते.
*5.* आवळा हा पाचक आहे. त्यामुळे पचन व्यवस्था व्यवस्थित राहते.
*6.* रक्त शुद्ध करण्यासाठी आवळा सरबत आणि मध खूप गुणकारी आहे.
*7.* लघवीचा ज्यांना त्रास आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले. सरबत प्यायल्याने लघवीसंबंधीचे आजार दूर होतात.
*8.* ज्यांना किडनी स्टोनचा आजार आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले. मुतखड्याचा आजार दूर होण्यास मदत होते.
*9.* आवळ्यामुळे मधुमेह (Diabetes) नियंत्रणात राहण्यास मदत होते.
*10.* आवळा ज्यूस आणि मध एकत्र करुन प्यायल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो.
0 Comments