सकाळची सुरुवात चांगली हवी* *असल्यास रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम

 *सकाळची सुरुवात चांगली हवी*

*असल्यास रात्री झोपण्यापूर्वी*

*खावी यापैकी कोणतीही १ गोष्ट*


पोट साफ न होणे ही एक कॉमन समस्‍या आहे. अनेक जण जास्‍त प्रमाणात जंक आणि स्‍पायसी फूड खातात. याव्‍यतिरिक्‍त त्‍यांची जीवनशैली अतिशय व्‍यस्‍त आणि अनियमित असते. झोपेची व जगण्‍याचीही निश्चित अशी वेळ नसते. या सर्वांचा परिणाम एकच होतो तो म्‍हणजे अपचन. 

येथे ५ असे पदार्थ सांगणार आहेत ज्‍यांचे झोपण्‍यापूर्वी तुम्‍ही सेवन केले तर सकाळी पोट चांगले साफ होईल. तसेच यांच्‍या नियमित सेवनाने अपचनाची समस्‍या कायमस्वरूपी दूर होऊ शकते.

*१)अंजीर*

झोपण्‍यापूर्वी २ अंजीर खा. यामुळे सकाळी पोट चांगले साफ होईल. अंजीरमध्‍ये भरपूर प्रमाणात फायबर असते. हे नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करते. ज्‍यांना अनेक वर्षांपासून अपचानाची समस्‍या आहे, त्‍यांनी आपल्‍या डाएटमध्‍ये अंजीरचा अवश्‍य समावेश केला पाहिजे. तसेच अंजीर खाताना नेहमी एका गोष्‍टीची काळजी घ्‍यावी की, ते नेहमी सालट्यासकट खावे. कारण त्‍याच्‍यामध्‍ये जास्‍त फायबर असते.

*२) बडीशेप*

बडीशेपमुळे digestive systemच्‍या आतड्यांची मुव्हमेंट वाढते. यामुळे रोज रात्री झोपण्‍यापूर्वी बडीशेप खाल्‍ल्‍यास यांचा चांगला फायदा होऊ शकतो.

*३) जवस*

रात्री झोपण्‍यापूर्वी २ ते ३ चम्‍मच जवसाच्‍या बीया पाण्‍यासोबत खा. यामुळे सकाळी पोट चांगले साफ होईल. जवसामध्‍ये भरपूर प्रमाणात फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. यामुळे अपचनासारखी गंभीर समस्‍याही ठिक होऊ शकते.

*४) एरंडाचे तेल*

एरंडाचे तेल लहान आणि मोठ्या आतड्यांना कार्यप्रवण करते. यामुळे चयापचय क्रिसा सुधारते. २ चम्‍मच एरंडीचे तेल १ कप दुधासोबत रात्री झोपण्‍यापूर्वी घ्‍यावे.

*५) इसबगोल*

जगात फायबरचा हा सर्वोत्‍तम सोर्स आहे. झोपण्‍यापूर्वी याचा १ चमचा गरम पाण्‍यासोबत घेतल्‍याने फायदा होतो.


Post a Comment

0 Comments