उपवासात फलाहार करताय? मग हे नक्की वाचा...

  *उपवासात फलाहार करताय? मग हे नक्की वाचा...*

उपवास म्हणलं कि, फळांचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं. फ्रुटसॅलड देखील खूप लोक खातात. फळं खाणं आरोग्याला चांगलंच, मात्र हे करताना काय काळजी घेतली पाहिजे ते आपण पाहू...


 *फ्रुटसॅलड खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळा* : फळांमध्ये उच्च प्रमाणात सुक्रोज, फ्रूक्टोज आणि यीस्ट असतं. फळं खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पाणी आणि अॅसिडमूळे पोटात यीस्टचा विस्तार होण्यास मदत मिळते. परिणामस्वरूप पोटात गॅस निर्माण होते आणि पोट फुगू लागतं.


 *ओव्हरइटिंग टाळा* : फळं अती प्रमाणात खाणे टाळावे. सलॅड आणि फळं खाल्ल्यानंतर पोटाचा त्रास होण्यामागे अयोग्य प्रमाणात सेवन करणे ठरतं.


 *अतिसाराचा धोका* : फळांमध्ये अधिक प्रमाणात पाणी असतं आणि फळं खाल्ल्यानंतर पाणी पिण्याने अतिसाराचा धोका वाढतो.


 *चावून खा* : फळांचे सेवन चावून न केल्याने, पोटात आढळणारे बॅक्टेरिया सामान्यपेक्षा अधिक वेगाने कार्बन डायऑक्साइडचं निर्माण करू लागतात ज्यामुळे पोट जड वाटू लागतं. ज्यामुळे ढेकर येण्याची आणि पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता वाढू लागते.


Post a Comment

0 Comments