तुळशीचं पान चघळा आणि तणावमुक्त व्हा

 *तुळशीचं पान चघळा आणि तणावमुक्त व्हा !*

_नैसर्गिक उपायाने दूर करा ताण-तणाव_

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत मानाचे आणि पवित्र स्थान दिले आहे. अनेक व्याधी आणि समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदामध्ये तुळशीचा वापर सांगितला आहे. त्यातील आरोग्यदायी घटक मन शांत करण्यासाठी तसेच ताण-तणाव कमी करण्यास मदत करतात. 


तुळशीमध्ये शरीरातील स्ट्रेस हार्मोन (कॉर्टिसोल) नियंत्रित करण्याची क्षमता आहे. ताण -तणावामुळे मेंदूचे होणारे नुकसान टाळण्यासही मदत होते. तुळशीच्या पानांमध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट्सचा मुबलक साठा आढळतो. परिणामी शरिरातील फ्री रॅडिकल्सचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य राखण्यास मदत होते. 


तुळशीमध्ये अ‍ॅडप्टोजेनिक क्षमता असते. त्यामुळे रक्ताभिसरणाच्या कार्यात सुधारणा होते. नर्व्हस शांत होतात. परिणामी ताण कमी होण्यास मदत होते. शरीरात ताणतणावामुळे वाढलेले ऑक्सिडेशन कमी होते. हळूहळू ताणतणावाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम रोखण्यासही मदत होते.


 तुळशीची पानं दिवसातून दोनदा चघळल्यास नैसर्गिकरित्या ताण कमी होण्यास कमी होते.


तुळशीचा काढा किंवा चहामध्ये तुळशीची पानं मिसळून उकळल्यास दिवसभरातील थकवा आणि ताण कमी होण्यास मदत होते.



Post a Comment

0 Comments